Abhishtchintan ceremony of Padmashri Prabhakarrao Vaidya was unforgettable

September 2, 2023

तुतारीचा उंच सूर, त्याला साथ लेझीमची, दाेन्ही बाजुला प्रेम करणारा जनसमुदाय आणि प्रत्येक पावलावर पुष्प वर्षाव हा अविस्मणीय साेहळा हाेता एका उत्तुंग व्यक्तीमत्वाच्या नागरीक सत्कार सोहळ्याचे ज्यामध्ये प्रत्येकजन साक्षी ठरले. कौन केहता है आसमान मे छेद नही हाेता, एक पत्थर ताे तबीयत से उछालो यार…. कवी दुष्यंत यांनी या दाेन ओळीद्वारे मानवी कर्तृत्वाची ओळख करून दिली. ज्यांना आपलं कर्तृत्व समाजाभिमुख करता आले त्यांचं व्यक्तीमत्व आभाळा एवढं झालं. असे थाेर व्यक्ती समाजासाठी कायमचे प्रेरणा देणारे ठरतात. अमरावती शहराचे भाग्यच म्हणावे लागले जिथल्या मातीतून कर्तृत्ववान व्यक्तीमत्व उदयास आले. त्यापैकी एक म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य. ज्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचे दर्शन त्यांच्या वाढदिवसानिमित्त्य आयाेजीत अभिष्टचिंतन साेहळ्यातून झाले. माजी विद्यार्थी संघ व पद्मश्रींवर प्रेम करणाऱ्या नागरीकांच्या पुढाकारातून २५ मे राेजी आयाेजीत अभिष्टचिंतन साेहळ्याला अखंड भारताचे स्वरूप प्राप्त झाले हाेते. गुरूवारी सकाळी ११.३० वाजता मंडळाच्या साेमश्वर पुसतकर सभागृह येथे माजी विद्यार्थ्यांद्वारे पद्मश्रींचे अभिष्टचिंतन करण्यात आले. या साेहळ्याला देशातील प्रत्येक राज्य व माेठ्या शहरांमधून विद्यार्थ्यांनी माेठ्या संख्येने भाग घेतला हाेता. यानंतर सायं.6 वाजता मंडळाच्या अनंत क्रीडा सभागृह येथे भव्य नागरीक सत्काराचे आयाेजन करण्यात आले हाेते. या साेहळ्याला परमपूज्य श्री श्री १००८ मदन माेहनदास महात्यागी महाराज, परमपूज्य १०८ महाशक्ती पीठाधीश्वर शक्ती महाराज, परमपूज्य श्री संत बालयाेगी वामन महाराज व परमपुज्य श्रीसंत राजेलाल साहिब उपस्थित होते. यानंतर समाजातील विविध मान्यवर, संस्था व मंडळातील सर्व विभागाद्वारे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचा भव्य असा नागरीक सत्कार करण्यात आला. यावेळी डाॅ. किशोर फुले यांनी दिमाखदार शैलीमध्ये पद्मश्री वैद्य साहेबांचा परिचय करून दिला तर प्रा. अर्चना देशपांडे यांनी मानपत्र सादर केले. यानंतर मंडळातील विद्यार्थ्यांनी भारतीय पारंपारीक खेळ व कवायतींचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. विजय पांडे यांनी तर आभार प्रा. दिपा कान्हेगावकर यांनी मानले. अभिष्टचिंतन साेहळ्याला मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंंडके, उपाध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत देशपांडे, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, डाॅ. अरुण खोडस्कर, समाजसेवक लप्पी सेठ जाजोदिया, समाजसेवक डाॅ. गाेविंद कासट, संपादक नानक अहूजा, क्रीडा उपसंचालक विजय संतान, क्रीडा विभागाचे सुधीर माेरे, राजेश क्षत्रिय, नगरसेवक विलास इंगाेले, शिवसेनेचे सुनिल खराटे, पुष्पाताई बोंडे, डाॅ. विजय भेंडे, ज्ञानेश्वर हिवसे, डाॅ. शाम राठी, डाॅ. उल्हास संगई, महेंद्र भुतडा, अजय दातेराव, माजी विद्यार्थी आर.पी लुथरा, दिग्दर्शक अमीत कुमार, चमन सिंग, निर्मलाजी, हाजीम मुस्ताक खान, हाजी रम्मुसेठ, इरान भाई, सलीम मिरावाले यांच्यासह शहरातील गणमान्य नागरीक व मंडळातील सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. पद्मश्री च्या वाढदिवसानिमित्त संबंध दिवसभर आयाेजीत कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता विदर्भ केसरी डाॅ. संजय तिरथकर, डाॅ. विजय पांडे, डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. ललीत शर्मा, विकास काेळेश्वर, प्रा. आशिष हाटेकर, प्रा. प्रतिक काेडे यांच्यासह प्राध्यापक व कर्मचाèयांचे माेलाचे याेगदान लाभले. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या वाढदिवसानिमित्त्य अनंत क्रीडा सहभागृह येथे आयाेजीत नागरीक सत्कार साेहळ्यामध्ये भारतीय पारंपारीक खेळ व कवायती सादरीकरणासाेबत पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या जीवनपटावर एका नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. प्रा. प्रणव चेंडके यांनी वैद्य साहेबांची भुमिका साकारत त्यांचे कार्यकर्तृत्वाची उपस्थितांना जाणीव करून दिली. ज्याला दर्शकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

गुरू मेरा पारब्रम्ह, गुरू भगवंत… (हेडिंग) पद्मश्रींच्या अभिष्टचिंतन साेहळ्याला एकवटला ‘अखंड भारत’ माजी विद्याथीं संघटनेच्यावतीने आयाेजन : वैद्य साहेबांप्रती व्यक्त केली कृतज्ञता गुरू शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीचा पाया. या देशाचं वैभव आणि विचारधारा. आज जग वेगाने बदलत आहे पण गुरू शिष्याची परंपरा आजही त्याच श्रद्धेने कायम आहे. याची अनुभूती मिळाली श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे. क्षण हाेता मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमीत्त्य आयाेजीत अभिष्टचिंतन साेहळ्याचे. माजी विद्यार्थी संघाच्यावतीने गुरूवारी २५ मे राेजी स्व. साेमेश्वर पुसतकर सभागृह येथे सकाळी ११.३० वाजता या अभिष्टचिंतन साेहळ्याला सुरूवात झाली. यावेळी व्यासपीठावर सत्कारमुर्ती पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष माजी प्राचार्य डाॅ. अजयपाल उपाध्याय अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, माजी विद्यार्थी अ‍ॅड. आय.पी लुथरा, अग्रवाल, डाॅ. विकास काेळेश्वर, राजवीर सिंग राठी, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अंजली राऊत, एडिशनल डायरेक्टर दिल्ली च्या निर्मला कुमारी आदी मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. दिपाताई कान्हेगावकर यांनी साकारलेली पद्मश्रींच्या जीवनपटावर आधारीत लघु चित्रीफित व दिल्ली येथील माजी विद्यार्थी सतीश कुमार व चमन सिंग दिग्दशींत चित्रपटातील दृष्ट दाखविण्यात आले, ज्यामध्ये वैद्य साहेबांचे प्रोत्साहनपर दृश्य हाेते. साेहळ्याची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन, माता सरस्वती व कै. अंबादासपंत वैद्य यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने पद्मश्रींचा वाढदिवस माेठ्या उत्साहात व जल्लाेषात पार पडला. देशातील प्रत्येक राज्य व माेठ्या शहरांमधून शेकडाे माजी विद्यार्थ्यांनी या साेहळ्याला उपस्थिती दर्शविली हाेती. यावेळी प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत श्री. हव्याप्र मंडळातील शैक्षणिक जीवनाचा व पद्मश्रींच्या कार्यकर्तृत्वाची उजाळली केली. ताऊंच्या कृपेमुळेच आज आम्ही आमच्या यशस्वी आयुष्याचे शिल्पकार झाला आहाेत. आज आम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात कार्य करीत आहाेत. मात्र, आमची ओळख ही श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामुळेच आहे. देशात कुठेही जा ! मंडळाला व पद्मश्रींना ओळखणारे लाेक हमखास मिळतात. आज आयुष्याच्या वाटेवर पुढे जातांना मंडळातील शैक्षणिक जीवन व ताऊंनी दिलेली शिकवण सदैव साेबत आहे. हीच आमच्या जीवनाची यशोगाथा ! असे मत व्यक्त करीत माजी विद्यार्थ्यांनी वैद्य साहेबांना वाढदिवसा निमित्त्य दिर्घायू हाेण्याच्या शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे यांनी मंडळाच्या शैक्षणिक व क्रीडा वाटचालीची माहिती दिली. डाॅ. श्रीकांत चेंडके यांनी क्रीडा विद्यापीठाची माहिती देत पद्मश्रींच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे मंडळाचे स्वप्न पुर्ण झाल्याचे मत व्यक्त केले. डाॅ. माधुरीताई चेंडके यांनी मंडळाच्या यशस्वी वाटचालीकरीता माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार व सहकार्य माेलाचे असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला मंडळाचे सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, डाॅ. अरुण खोडस्कर, डाॅ. किशाेर फुले यांचेसह मंडळाच्या कार्यकारीचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे संचलन प्रा. आशिष हाटेकर तर आभार यादराम गुजर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डाॅ. ललीत शर्मा, डाॅ. संजय तिरथकर, डाॅ. विजय पांडे, डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, प्रा. प्रतीक कोडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. माणुस म्हणून जगतांना देश व समाजाप्रती आपली सामाजिक बांधिलकी जोपासावी लागते. याच विचारांच्या आधारे मी युवकांना प्रेरीत करीत गेलाे. मंडळ प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तीमत्व घडविण्याकरिता अथक परिश्रम घेत आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी देशभरात यशस्वीरित्या कार्यरत आहे. मंडळाने दिलेला हा संस्कार आजही कायम असून त्याची प्रचिती माजी विद्यार्थांच्या आयोजनातून दिसते. हाच संस्कार पुढच्या पीढीला देत त्यांना व आपल्या पाल्यांना मंडळाशी जाेडावे असे आवाहन करीत वैद्य साहेबांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले.