अमरावती दि.५ : याेग : चित्त-वृत्ती निराेध: याेगसुत्र १.२, भारतीय संस्कृतीचा पाया, बलस्थान असलेला याेग आज जागतिक स्तरावर प्रत्येकाची दिनचर्या ठरला आहे. आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण करणारी याेग प्रक्रिया प्रत्येक देशवासी यांमध्ये अंर्तभूत असावी व प्राचीन योगासनाचे ज्ञान सर्व सामान्य पर्यंत पोहचावे या ध्येयातून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे एक दिवसीय दुसरी राष्ट्रीय योगासन खुली स्पर्धा साेमवार दि.२ ऑक्टाें. राेजी याेग विभाग येथे माेठ्या उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये देशातील ८ राज्यातील तब्बल २३० स्पर्धकांनी सहभाग घेत याेगशक्तीचे सादरीकरण केले. बृहन महाराष्ट्र योग परिषद, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आयकेएस सेंटर, मंडळाचे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने याेग विभाग येथे आयोजित दुसऱ्या एक दिवसीय राष्ट्रीय योग स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे उपस्थित हाेते. उद्घाटक मंडळाच्या सचिव व भारतीय ज्ञान परंपरा केंद्रा क्या समन्वयक प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, मार्गदर्शक डाॅ. अरुण खोडस्कर, याेग विभागप्रमुख डाॅ. सुनील लाबडे व गिरीजन शारीरिक शिक्षण महाविद्यालय चिखलदरा चे प्राचार्य अतुल निंबेकर आदी मान्यवर उपस्थित हाेते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी चिमुकला योगपटू अर्थव खाेडस्कर याने विविध याेगासन सादर करीत याेग स्पर्धेची सुरूवात केली. कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना उद्घाटक प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांनी मार्गदर्शन केले, त्या म्हणाल्या, याेग हा शब्द ’युज’ या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. याेग ही भारतातील हजाराे वर्ष प्राचीन ज्ञान व जीवन शैली आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्थापनेपासूनच याेग चा प्रचार-प्रसार करीत याेग सर्वसामान्यांचा जीवनशैलीचा एक भाग बनवित आहे. आता या कार्यामध्ये मंडळामध्ये स्थापित इंडियन नॉलेज सिस्टम सेंटर (आयकेएस) च्या माध्यमातून याेग चळवळीला बळ मिळाले असून याेग प्रत्येकाची दिनचर्या ठरत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे म्हणाले, याेग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समताेल आणि त्या अनादी अनंत तत्वाला स्पर्श करत अध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे. राष्ट्रीय योग स्पर्धेच्या माध्यमातून याेग चळवळीचे शिलेदार निर्माण हाेत आहे. त्याद्वारे प्रत्येकापर्यंत व प्रत्येकाचा याेग हेच ध्येय सक्षम युवापीढी, देश आणि समाजाचे आहे. त्या उद्देशाने दुसरी एकदिवसीय खुली राष्ट्रीय याेगासन स्पर्धा महत्वपूर्ण असल्याचे मत प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक द्वारा योग विभागप्रमुख डाॅ. सुनील लाबडे यांनी मंडळाच्या याेग व शारीरीक शिक्षणाची माहिती सादर केली. संचलन प्रा. अर्चना देशपांडे तर आभार प्रा. प्रतिक पाथरे यांनी मानले. कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, याेग विभागाचे विद्यार्थी तसेच पालकवर्ग माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.राष्ट्रीय योगासन स्पर्धेत २३० स्पर्धकांनी साधली ‘याेगशक्ती’ श्री हव्याप्र मंडळात एक दिवसीय राष्ट्रीय याेग स्पर्धा : ८ राज्यातील स्पर्धकांचा समावेश अमरावती दि.५ : याेग : चित्त-वृत्ती निराेध: याेगसुत्र १.२, भारतीय संस्कृतीचा पाया, बलस्थान असलेला याेग आज जागतिक स्तरावर प्रत्येकाची दिनचर्या ठरला आहे. आत्म्याचे परमात्म्यात विलीनीकरण करणारी याेग प्रक्रिया प्रत्येक देशवासी यांमध्ये अंर्तभूत असावी व प्राचीन योगासनाचे ज्ञान सर्व सामान्य पर्यंत पोहचावे या ध्येयातून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे एक दिवसीय दुसरी राष्ट्रीय योगासन खुली स्पर्धा साेमवार दि.२ ऑक्टाें. राेजी याेग विभाग येथे माेठ्या उत्साहात पार पडली. या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये देशातील ८ राज्यातील तब्बल २३० स्पर्धकांनी सहभाग घेत याेगशक्तीचे सादरीकरण केले. बृहन महाराष्ट्र योग परिषद, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आयकेएस सेंटर, मंडळाचे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या संयुक्त विद्यमाने याेग विभाग येथे आयोजित दुसऱ्या एक दिवसीय राष्ट्रीय योग स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे उपस्थित हाेते. उद्घाटक मंडळाच्या सचिव व भारतीय ज्ञान परंपरा केंद्रा क्या समन्वयक प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, मार्गदर्शक डाॅ. अरुण खोडस्कर, याेग विभागप