श्री हव्याप्र मंडळाची प्रियंका कुंडू राष्ट्रीय स्तरावर अ. भा. स्थल सैनिक शिबीर स्पर्धेत तिसरी रँक : पद्मश्रींचे घेतले आशीर्वाद

October 10, 2023

अमरावती दि.१० : करिअप्पा परेड ग्राऊंड डि.जी हेडक्वाॅटर नवी दिल्ली येथे एनसीसी च्या अखिल भारतीय स्थल सैनिक शिबीराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रियंका कुंडू ने या स्पर्धेत दमदार प्रदर्शन करीत राष्ट्रीयस्तरावर तिसरी रँक मध्ये येण्याचा बहूमान पटकावला आहे. पियंकाने पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांची भेट घेत आशीर्वाद घेतला. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाच्या बी.पीएड अंतीम वर्षाची विद्यार्थी प्रियंका कुंडू, प. बंगाल येथील रहिवाशी असून अ‍ॅथलॅटीक्स खेळामध्ये तिचे प्राविण्य आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या एनसीसी राष्ट्रीय स्पर्धेत तीने ऑपस्ट्रॅकल्स ट्रेनिंग आणि टेंट पिंचीग खेळामध्ये दर्जेदार प्रदर्शन करीत यश संपादीत केले. यापूर्वीही २०१३ व २०२२ मध्ये सुद्धा प्रियंकाने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले हाेते. प्रा. अक्षय गोहाड, प्रा. देवानंद सावरकर यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे यश संपादीत करता आले असल्याचे मत प्रियंका कुंडू ने व्यक्त केले. प्रियंकाचे नेत्रदिपक यश मंडळाच्या लाैकीकामध्ये भर टाकणारे असल्याचे मत पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी व्यक्त केले असून मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, प्रशिक्षक अक्षय गाेहाड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, प्रशिक्षक, प्राध्यापक व सर्व खेळाडू विद्यार्थ्यांतर्फे प्रियंकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.