अमरावती दि.१५ : जन्म आणि मृत्यू ! हे मानवी जीवनाचे सत्य. जीवनाच्या प्रवासा अखेर प्रत्येकाला 'मृत्यू' या अंतीम सत्याचा स्वीकार करावाच लागते. ज्यांना या सत्याचा बाेध हाेते. त्यांचे जगणे धन्य होते, त्यांचे मरण धन्य होते आणि त्यांचे स्मरणहि सर्वांना धन्यतेची अनुभूती देते असते. अशा व्यक्तीचा 'परिसस्पर्श' इतराहचे जीवनही उजळून टाकतो. याची अनुभूती झाली ती, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आजन्म सेवक स्व. डाॅ. सुरेशराव देशपांडे यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात. माणसानं जगावं कसं आणि मरावं कसं याची जाणीव श्रद्धाजंली वाहण्यास आलेल्या असंख्य नागरिकांना होत होती. स्व. डाॅ. सुरेशराव देशपांडे यांच्या आदर्श व्यक्तीमत्वाची माहिती व्यक्त हाेत असतांना 'धन्य ते जीवन, धन्य ते स्मरण' प्रत्येकाच्या शब्दातून व्यक्त हाेत हाेते. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे आजन्म सेवक, माजी प्राचार्य, माजी कोषाध्यक्ष स्व. डाॅ. सुरेशराव देशपांडे यांचे दि.१ सप्टेंबर २०२३ राेजी जापान येथे निधन झाले. त्यांचे सुपूत्र जितेंद्र यांनी जापान येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मंडळाचे आजन्म सेवक व मंडळाच्या वाटचालीमध्ये पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या खांद्याला खादां लावून माेलाची भूमिका पार पाडणारे स्व. डाॅ. सुरेशराव देशपांडे यांच्या निधनाने मंडळाची मोठी हाणी झाली. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बुधवार दि.१३ सप्टेंबर राेजी स्व. साेमेश्वर पुसतकर सभागृह येथे श्रद्धाजंलीपर सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजीत या सभेला शहरातील गणमान्य व्यक्तिमत्व उपस्थित हाेते. सर्वप्रथम मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके व प्रा. दिपा कान्हेगावकर यांनी स्व. डाॅ. सुरेश देशपांडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पीत करीत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी स्व. डाॅ. देशपांडे यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकणारी चित्रफीत सादर करण्यात आली. यानंतर सभेला उपस्थित शहरातील गणमान्य व्यक्तींनी मनाेगत व्यक्त करीत स्व. देशपांडे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पित केली. सभेचे संचलन डाॅ. विजय पांडे यांनी केले. सभेला मंडळाची कार्यकारिणी सदस्य डाॅ. किशोर फुले, प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, माजी खा. अनंतराव गुढे, नगरसेवक विलास इंगाेले, अॅड. किशाेर देशपांडे, डाॅ. सावदेकर, डाॅ. विनाेद काेलवाडकर, डाॅ. गोविंद कासट, डाॅ. अविनाश माेहरील, श्री केवले, दिलीप कलाेती, सुरेशराव निर्मळ, मधुकर कांबे, अतुल भारद्वाज, एकनाथराव घाेम, दिलीप दाभाडे, प्रदीप पिंपळकर, मंडळाचे अनेक ज्येष्ठ कार्यकारणी सदस्य यांच्या सह डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, डाॅ. संजय तिरथकर, डाॅ. मधुकर बुरनासे, प्रा. नवाथे, प्रा. आशिष हाटेकर, डाॅ. ललीत शर्मा यांच्यासह मंडळातील सर्व विभागाचे प्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित हाेते.
आदर्श मित्र : पद्मश्री
भाग्यच म्हणावं लागेल, खरा मित्र भेटण्याकरीता. मंडळाच्या वाटचालीमध्ये डाॅ. सुरेश देशपांडे यांनी खांद्याला खांदा लावत अखेरच्या श्वासापर्यंत सेवा दिली. त्यांच्या नेतृत्वामध्ये मंडळाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. एक आदर्श मित्र म्हणून डाॅ. सुरेशराव देशपांडे यांचे कार्य कधीही विसरू शकत नाही.
एकरूप व्यक्तिमत्व : डाॅ. फुलेरी
त्याग, समर्पण आणि देशभक्ती ही मंडळाची ओळख. आजवर अनेक समर्पित व्यक्तीमत्वांचे अथक परिश्रमामुळे येथील मातीला रंग आजही लाल आहे. त्यामध्ये स्व. डाॅ. देशपांडे साहेबांचे कार्य संस्थेच्या प्रगतीचा भक्कम पाया ठरला आहे. संस्थेशी एकरूप असलेले स्व. देशपांडे यांचे कार्य सदैव प्रेरणा देत राहील.
कर्तृत्वाचा ध्रूवतारा : अनंतराव गुढे
एखादं व्यक्तीमत्व किती विशाल असू शकते याची प्रचिती स्व. डाॅ. सुरेशराव देशपांडे यांच्या व्यक्तीमत्वातून दिसून येते. प्रत्येक दिवस व्यस्त असतांना त्यांना नेहमी हसतच बघितले. दुसऱ्यांना सदैव सकारात्मक प्रेरणा देणारे स्व. देशपांडे खèया अर्थाने कर्तृत्वाचा ध्रूवतारा हाेते.
बहुगुणी व्यक्तिमत्व : डाॅ. काेलवाडकररी
जीवन जगतांना मणुष्याला सात गुण जपावे लागते. आठवा गुण काैल्य म्हणजेच कुळ जीथे आपला जन्म हाेताे, आपल्या हाती नसताे. पण कर्तृत्वाने स्वत:चा कुळ करीत स्व. सुरेशराव देशपांडे यांनी मंडळाला आतंरराष्ट्रीयस्तरावर ओळख दिली. या असे बहूगुणी व्यक्तीमत्व सदैव प्रेरणा देत राहील.
मार्गदर्शक हरवला : डॉ. माधुरीताई चेंडके
मंडळाचे आधार स्तंभ डॉ. सुरेशराव देशपांडे यांचे मार्गदर्शन मला बालपणापासून लाभले होते. कोणतीही गोष्ट समजावून सांगण्याची त्यांचीही शैली विलक्षण होती. एक शिक्षक म्हणूनही मला त्यांचे अखेर पर्यंत मार्गदर्शन लाभले. त्यांच्या जाण्याने एक आदर्श मार्गदर्शक हरपला आहे.