अमरावती दि.१४ : आजच्या आधुनिक युगामध्ये युवा पीढीला सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी अनेक माध्यमांचा उपयाेग हाेत असला तरी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ पारंपारीक व आधुनिक खेळ, प्रशिक्षणाच्या माध्यामातून स्थानिक युवापीढीला एक आतंराष्ट्रीय व्यासपीठ व सक्षम व्यक्तीमत्व साकारत आहे. परिणामी आज मंडळाचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेते ठरत आहे. अशाच यशस्वी खेळाडूंचा सत्कार गाैरवास्पद असून स्थापने पासून तर आजवर एकुण 108 वर्षांच्या कालावधीमध्ये श्री हव्याप्र मंडळ क्रीडा, सामाजिक कारकीर्द प्रेरणादायी आहे. जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंचे नाव व लौकिक वाढावा याकरिता शासन कटिबद्ध असून मंडळ व येथील खेळाडूंच्या विकासासाठी शासन खंबीरपणे पाठीशी असल्याचे जिल्हाधिकारी साैरभ कटीयार यांनी व्यक्त केले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. साेमेश्वर पुसतकर सभागृह येथे शुक्रवार दि.१३ ऑक्टाे. राेजी सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्पर्धेत विजेते खेळाडूंच्या सत्कार साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी कटीयार उपस्थितांना संबाेधीत करीत हाेते. सोहळ्याला अध्यक्ष म्हणून मंडळाचे सचिव प्रा. डाॅ. रविंद्र खांडेकर, प्रमुख उपस्थितीमध्ये मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, डाॅ. लक्ष्मीकांत खंडागळे, कोषाध्यक्ष अमरावती जिल्हा जिम्नॅस्टीक संघाचे प्रा. राजेश पांडे, डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे परीक्षा नियंत्रक प्रा. डाॅ. विजय पांडे आदी मान्यवर उपस्थित हाेते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवराच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हाधिकारी साैरभ कटीयार यांची श्री हव्याप्र मंडळाला पहिलीच भेट निमीत्त्य त्यांचे हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. यांनतर विजेते १८ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सर्वप्रथम उजबेकीस्थान येथे हाेत असलेल्या १३ व्या अॅक्राेबॅटीक्स जिम्नास्टीक एशियन चॅम्पीयनशिप २०२३-२४ स्पर्धेकरीत निवड झालेल्या हिमांशु जैन व क्रीष्णा भट्टड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांनी केले. संचलन प्रा. आशिष हाटेकर तर आभार डाॅ. मधुकर बुरनासे यांनी मानले. या सत्कार साेहळ्याला मंडळाचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्रशिक्षक, खेळाडू आणि पालकवर्ग माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
प्रा. आशिष हाटेकर सन्मानित श्री हव्याप्र मंडळाचे जिम्नॅस्टिक विभाग प्रमुख प्रा. आशिष हाटेकर यांची दुसऱ्यांदा जिम्नास्टीक फेडरेशन ऑफ इंडिया च्यावतीने १३ व्या अॅक्राेबॅटीक्स जिम्नास्टीक एशियन चॅम्पीयनशिप २०२३-२४ करीता ताशकंद उजबेकीस्थान येथे होणाऱ्या स्पर्धेकरीता भारतीय संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती मंडळाकरीता बहूमान असून जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
खेळाडूंचा सत्कार राजेश गुप्ता : 30 व्या जागतिक वल्ड एज गृप स्पर्धेत ट्रॅम्पुलीन जिम्नास्टीक करीता निवड. शुटींग : कृष्णा शेळके - अहमदाबाद येथे पार पडलेल्या 10 व्या वेस्ट झाेन नॅशनल चॅम्पीयन शीप मध्ये 50 मी. प्राेन राय\ल स्पर्धेत राैप्य पदक. स्वीमींग : चेन्नई ज्यु. नॅशनल स्पर्धा - मंथन शिवणीकर राैप्य पदक, आर्यन हिंगरे राैप्य पदक, श्रावणी सपाटे कांस्य पदक, अंजली राऊत कांस्य पदक, भुमीका गीरी कांस्य पदक. मल्लखांब : नेहा धारसिंबे, चंदा भातकुलकर, मिनाक्षी राजबिंडे, श्रेयशी भडांगे - अलीगड येथील अ. भा. आंतर विद्यापीठ स्पर्धेत कांस्य पदक. क्रिकेट : जितेश शर्मा, एशियन गेम क्रिकेट चायना 2023 सुवर्णपदक. याेगासन : सुनील कुमार काेटा, राष्ट्रीय जनजाती याेगासन स्पर्धा, उडिसा सुवर्ण पदक. आयुषी पांडे, द्वितीय राष्ट्रीय खुल्या स्पर्धेत सुवर्ण पदक, सर्वेश डांगे, रजत पदक. मार्शल आर्ट : व्यंकटेश नेरकर, मुंबई येथे झालेल्या राष्ट्रॅीय मार्शल आर्ट स्पर्धेत सुवर्ण पदक.