भारतीय पारंपारीक खेळांचा देशासह जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार व प्रशिक्षणात्मक संशाेधन करणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर माेठा बहूमान मिळाला आहे. क्रीडा विद्यापीठाचा दर्जा प्राप्त मंडळाचा थेट रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाशी करार झाला आहे. एका खासगी क्रीडा संस्थेशी झालेला हा करार देशात प्रथमच असून मंगळवार दि.१६ मे २०२३ राेजी मंडळाच्या स्व. साेमेश्वर पुसतकर सभागृह येथे ऑनलाईन पद्धतीने या क्रीडा व शैक्षणिक काराराला औपचारीक स्वरूप देण्यात आले. या ऑनलाईन साेहळ्याला रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाचे रेक्टर (कुलगुरू) लेव बेलुजाेव, प्राे-रेक्टर (प्र-कुलगुरू) इरिना बादायान, प्रकल्प प्रमुख डायना प्रूवईज्, समन्वयक इया माचाराेक्झाे, रशियन ऑलेम्पीक मेडलीस्ट युरी, भारतीय ऑलेम्पीक जलतरणपटू गगन उल्लालमथ, स्वर्णिम गुजरात विद्यापीठाचे कुलगुरू अर्जुनसिंग राणा, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, शैक्षणिक व क्रीडा काराराचे प्रमुख व समन्वयक प्रा. प्रणव चेंडके, मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंंडके, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे आदी मान्यवर उपस्थित हाेते
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाशी झालेला क्रीडा व शैक्षणिक करार भारतीय खेळांडूंकरीता माेठी सुवर्ण संधी ठरणारी आहे. या काराराद्वारे स्थानिक खेळाडूंना ऑलेम्पीक विद्यापीठात शिकण्याची संधी साेबत श्री हव्याप्र मंडळ व रशियन ऑलेम्पीक विद्यापीठाच्या समन्वयाने क्रीडा क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान व प्रशिक्षण अवगत करता येणार आहे. ज्याला लाभ मंडळातील खेळाडूंना मिळेल असा विश्वास पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी व्यक्त केला.