खेळांना आत्मसात करून उत्तुंग व्यक्तिमत्व घडवा : डाॅ. श्रीकांत चेंडके श्री हव्याप्र मंडळ येथे उन्हाळी शिबीराचे उद्घाटन थाटात
आजच्या आधुनिक युगामध्ये खेळ व्यक्तीमत्व साकार करण्याचे सक्षम माध्यम ठरत आहे. शिक्षणासाेबत क्रीडा काैशल्याची गरज आजच्या प्रत्येक मुला-मुलींना गरजेची झाली आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ स्वातंत्रपूर्व काळापासून युवापीढीला भारतीय पारंपारीक व आधुनिक खेळांशी जाेळत आहे. हा संस्कार लहान मुलांनी आत्मसात करीत त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व घडविण्याकरीता मंडळाचे उन्हाळी शिबीर खात्रिशीर सशक्त माध्यम असल्याचा विश्वास श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके यांनी व्यक्त केले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे साेमवार दि.१५ मे २०२३ राेजी उन्हाळी शिबीराचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून डाॅ. श्रीकांत चेंडके उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून दै. प्रतिदिनचे संपादक श्री नानकभाई अहूजा, आतंरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक ग्रँड मास्टर अनुप देशमुख, अजय बत्रा, डाॅ. संजय तिरथकर, शिबीर संचालक राजेश महात्मे, मुख्याध्यापक सुरेश भारसाकळे, विजय चाचरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन साेहळ्याची सुरूवात संस्थापक स्व. अंबादासपंत वैद्य यांचे प्रतिमापुजनाने व मान्यवरांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाला संबोधित करताना ग्र्रँडमास्टर अनुप देशमुख म्हणाले, खेळ कुठलाही असाे, फक्त ताे आपल्या आवडीचा असाे. अशा खेळांना आत्मसात केल्यास मन आणि आराेग हे निराेगी राहते. जेथे निराेगी आराेग्य तेथे आयुष्याची वाटचाल ही यशस्वी ठरते. आज या शिबीराच्या माध्यमातुन मुला-मुलींनी खेळांकडे एक पाऊल टाकले याचा आनंद आहे.
यानंतर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उन्हाळी शिबीर संचालक राजेश महात्मे केले. या दरम्यान त्यांनी मंडळातील सर्व क्रीडा व शैक्षणिक उपक्रमांची अभ्यासपुर्ण माहिती दिली. संचलन प्रा. आशिष हाटेकर यांनी तर आभार विदर्भ केसरी डाॅ. संजय तिरथकर यांनी मानले. कार्यक्रमाला माेठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित हाेते
अमरावती शहराच्या क्रीडा आणि सामाजिक कार्याच्या वाटचालीमध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा सिंंहाचा वाटा आहे. पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी विविध खेळ प्रत्येक घटकांपर्यंत आणि प्रत्येक मुला-मलींपर्यंत पाेहचविले तसेच त्यांना खेळांशी जाेळले. मी सुद्धा याच मंडळाचा विद्यार्थी हाेते. पूर्वीच्या तुलनेत आज काळ वेगाने बदलत आहे. मात्र, मंडळाचे क्रीडा व सामाजिक ध्येय धाेरण आजही त्याच विचारांवर दृढ आहेत. याचे श्रेय केवळ प्रभाकरराव वैद्य यांना असून ‘पद्मश्री’ हे क्रीडा क्षेत्रातील ‘पितामह’ असल्याचे मत संपादक श्री नानकभाई अहूजा यांनी व्यक्त केले.