विदर्भातील पहिल्या शूटिंग प्रयाेगात श्री हव्याप्र मंडळाला सुवर्ण यश ५० मीटर रायफल प्रोन शूटिंग मध्ये १ सुवर्ण तर ५० मीटर पिस्टोल व २५ मीटर पिस्टोल मध्ये २ कांस्य पदक प्राप्त.
भारतीय पारंपरिक व आधुनिक अशा सर्व खेळांचे प्रशिक्षण देणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ शुटींग क्रीडा क्षेत्रामध्ये दरवेळी नवनवीन लाैकीक प्राप्त करीत आहे. संपुर्ण विदर्भामध्ये ५० व २५ मीटर रेंज नसतांना मंडळाच्या शुटींग विभागाच्यावतीने खेळाडूंना ५० मीटर शुटींग प्रशिक्षण देत 26th Capt. S. J. Ezekiel MMSSC-2023 स्पर्धेत अचुक वेध घेत एक सुवर्ण व दाेन कांस्य पदकाचा वेध घेतला.
स्थानिक विद्यार्थ्यांना शुटींग मध्ये अद्ययावत प्रशिक्षण व साेयी, सुविधा मिळाव्यात याकरीता मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य व सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली शुटींग विभाग प्रमुख व प्रशिक्षक राहुल उगले यांनी नाशिक येथील प्रशिक्षक व ISSF पंच श्रद्धा नालमवार मॅडम यांचे ५० मी. पिस्टाेल शुटींगचे तर पुणे बालेवाडी येथील स्नेहल पाटील मॅडम व राज दाभाडे सर (लोणावळा) यांचे कडून ५० मी. प्राेन रायफल शुटींग प्रशिक्षण खेळाडूंना उपलब्ध करून दिलेत. अत्यंत कमी कालावधीमध्ये मिळालेल्या फायर आर्म प्रशिक्षणातून मंडळाच्या शुटींग विभागातील खेळाडूंनी अचुक ध्येय साध्य केले.
श्री. ह.व्या.प्र. मंडळाच्या शूटर्स नी या स्पर्धेत महाराष्ट्रातून १ सुवर्ण पदक ५० मीटर रायफल प्राेन शूटिंग क्रीष्णा शेळके, २५ मीटर पिस्टोल शूटिंग मध्ये जानवी मानतकर कांस्य पदक, तसेच पुष्कर निर्मल याने ५० मीटर पिस्टाेल मध्ये कांस्य पदक, तसेच प्रशिक्षक राहुल उगले ५० मीटर प्राेन रायफल शूटिंग व अतुल वडे ५० मीटर रायफल प्रोन तसेच शरयू वऱ्हाडे ५० मीटर प्राेन रायफल शूटिंग या सर्वांची होणाऱ्या पश्चिम विभागीय स्पर्धा २०२३ व ऑल इंडिया जी.व्ही. मावलनकर २०२३ ह्या पूर्व राष्ट्रीय स्पर्धे मध्ये निवड झालेली आहेत.
साेबतच Hon. Gen. Secretory of Maharashtra Rifle Association – Sheila Kanungo Madam व इंटरनॅशनल खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन रुद्राँक्ष पाटील यांच्याकडून सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले आहे. अमरावती शहरातील फायर आर्म शूटिंग करणारे हे सर्वच पहिलेच खेळाडू आहेत. त्या आधी २०२२ मध्ये प्रशिक्षक राहुल उगले यांनी पहिल्यांदाच फायर आर्म ५० मीटर पिस्टाेल ह्या खेळाचे प्रशिक्षण घेतले आहे व त्यांची पूर्व राष्ट्रीय स्पर्धे करिता निवड झाली होती तसेच ह्या वेळी त्यांनी ५० मीटर रायफल प्रोन प्रकारावर सुद्धा आपली पकड निर्माण केली आहे.
या खेळाडूंच्या यशाबद्दल मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कार्याध्यक्ष डाॅ. रमेशपंत गाेडबाेले, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, उपाध्यक्ष एड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, काेषाध्यक्ष डाॅ. श्रीनिवास देशपांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक व विद्यार्थी वर्गाद्वारे प्रशिक्षक राहूल उगले, प्रा. डॉ. ललित शर्मा, आनंद महाजन व सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत आहे.