श्री हव्याप्र मंडळाला भेट देणार रशियन ऑलेम्पीक विद्यापीठाचे विद्यार्थी शैक्षणिक सत्राच्या उद्घाटन सोहळ्याला प्रा. प्रणव चेंडके यांचे मार्गदर्शन

September 2, 2023

अमरावती दि. २० : भारतीय पारंपारीक खेळांचा प्रचार-प्रसार, प्रशिक्षण आणि उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिकस्तरावर लौकीक असलेले श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा रशियन ऑलम्पीक विद्यापीठाशी झालेला शैक्षणिक, क्रीडा करारा ला मुर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. दि. १३ आणि १५ सप्टेंबर दरम्यान रशियन ऑलम्पीक विद्यापीठ रशिया येथे नविन शैक्षणिक सत्राचे उद्घाटन व मार्गदर्शनपर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे वैशिष्ट म्हणजे, श्री हव्याप्र मंडळाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये प्रा. प्रणव चेंडके यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्य, भारतीय पारंपारीक खेळ आणि संस्कृतीची अभ्यासपुर्ण माहिती उपस्थितांना दिली. यावेळी मंडळ आणि रशियन ऑलम्पीक विद्यापीठाच्या शैक्षणिक, क्रीडा करारानुसार रशियन विद्यार्थ्यांना इंटरनशीप स्वरूपात मंडळाद्वारे आमंत्रण देण्यात आले. जागतिक क्रीडा क्षेत्रातील अव्वल असलेल्या रशियन ऑलम्पीक विद्यापीठाचा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाशी शैक्षणिक व क्रीडा करार मोठ्या थाटात पार पडला. मंडळामध्ये पार पडलेल्या या सोहळा दरम्यान डिग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन महाविद्यालयाच्या बी. पीएड सत्राची विद्यार्थीनी टीसेरींग युडॉन ची रशियन ऑलम्पीक विद्यापीठ येथे उच्च शिक्षणाकरीता निवड करण्यात आली. सध्या ती याच रशियन विद्यापीठात शिक्षण घेत आहे. या विद्यापीठामध्ये जगातील अनेक देशांमधील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याकरिता भर देत असतात, हे या विद्यापीठाचे वैशिष्ट्य. शैक्षणिक कारारचा दुसरा भाग म्हणून रशियन ऑलम्पीक विद्यापीठ येथे मास्टर इन स्पोर्ट ॲडमिस्ट्रेशन या शैक्षणिक सत्राचे उद्घाटन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रा. प्रणव चेंडके यांना माजी विद्यार्थी म्हणून विशेष अतिथी स्वरूपात आमंत्रित करण्यात आले होते. तीन दिवसीय कार्यक्रम दरम्यान प्रा. प्रणव चेंडके यांनी प्रभावी मार्गदर्शन करीत तेथील विद्यार्थ्यांना श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे इंटरनशिप अंतर्गत आमंत्रित केले. या आमंत्रणाचा रशियन ऑलम्पीक विद्यापीठाने स्विकार केला आहे. प्रा. प्रणव चेंडके यांच्या पुढाकारातून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व रशियन ऑलम्पीक विद्यापीठ यांच्यातील करारा दृढ झाल्याबद्दल मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव प्रा. रविंद्र खांडेकर, प्राचार्य डॉ. श्रीनिवास देशपांडे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्गातर्फे प्रा. प्रणव चेंडके यांच्या भरीव कामगीरी बद्दल अभिनंद, करण्यात येत आहे.