बालपण असावं तर असं… श्री हव्याप्र मंडळाच्या उन्हाळी क्रीडा शिबीराला खेळांचं वैभव !ना याेग बळ

September 2, 2023

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणाचा एक अनमाेल ठेवा असताे. माणुस माेठा हाेत असला तरी बालपणातील त्या निरासग हसण्या-खेळण्याचा आठवणी सदैव स्मरणात असतात. आजच्या आधुनिक काळामध्ये ते बालपण हरवत असल्याची खंत प्रत्येकाला आहे. त्यामुळे किमान आपल्या मुलांना तेच बालपण जगता यावं याकरीता प्रत्येक पालकांची धडपड असते. अमरावती शहर व जिल्हावासीयांबाबत ही धडपड काही वेगळी असते. उन्हाळी सुटी लागली की, मुलांसह पालकांना वेध लागते ते श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या उन्हाळी शिबीराचे. २० एप्रिल २०२३ राेजी सुरू झालेल्या उन्हाळी शिबीरामध्ये विविध पारंपारीक व आधुनिक क्रीडा प्रशिक्षण देण्यात येत असून या शिबीरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा उत्साह बालपणाच्या दिवसांची आठवण करून देत आहे. बलम् उपास्व : हे ध्येय जाेपासत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने समाजाला भारतीय पारंपारीक खेळ व सर्वांगिण शारिरीक व्यायामाशी जाेडले आहे. समाजातील मुलं, तरूण पीढी निराेगी असावी, राष्ट्रहितासाठी प्रेरक असावी करीता १९२४ पासून मंडळामध्ये उन्हाळी क्रीडा शिबीराचे सातत्याने आयाेजन करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही मंडळाच्या या शिबीराला लहान मुले- मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. शिबीरात जलतरण, बास्केटबाॅल, बॅडमिंटन, तायक्वांडाे, फूटबाॅल, याेगा, कुस्ती, क्रिकेट, शुटींग रेंज, बॅडमिंटन, जिम्नाॅस्टिक आणि अ‍ॅराेबिक्स सह विविध खेळांचेे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके व क्रीडा शिबीर प्रमुख डाॅ. जयंत इंगाेले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना पारंपारीक व आधुनिक क्रीडा प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा आनंद हा द्विगुणीत असून खेळांप्रती त्यांची आवड पालकांकरीता समाधानाची बाब ठरत आहे. सक्षम युवा पिढीचे अविरत ध्येय जाेपासणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ १९२४ पासून उन्हाळी क्रीडा शिबीर यशस्वीरित्या घेत आहेत. आज ही मंडळाची वैभवशाली परंपरा असून येथे आधुनिक व पारंपारिक खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला सशक्त करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही उन्हाळी क्रीडा प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मत ग्रिष्मकालीन क्रीडा शिबीर संचालक प्रा. जयंत इंगाेले यांनी व्यक्त केले.