उन्हाळी सुटी म्हणजे लहान मुला-मुलींकरीता धम्माल मस्ती आणि मज्जा. या सुट्यांमध्ये पाल्यांनी भरभरून आनंद लुटत काहीतरी आगळं वेगळं शिकावं हा पालकांचा ध्यास. त्याकरीता श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील उन्हाळी शिबीर ‘सर्वांग सुंदर’ असे ठरत आहे. येथे सुरू असलेल्या उन्हाळी शिबीरामध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी मुलांना मिळत आहे. प्रामुख्याने गर्मीच्या दिवसांमध्ये जलतरण प्रशिक्षण दरम्यान पाेहण्याचा आणि पाण्यात खेळण्याची मज्जा काही वेगळीच असते. अशीच मजा आणि प्रशिक्षणाचा आनंद लुटतांना मुलं-मुली.