भारतीय पारंपारीक खेळ, याेग व निसर्गाेपचार पद्धतीला मिळणार बळ श्री हव्याप्र मंडळात सुरू हाेणार इंडियन नाॅलेज सिस्टीम सेंटर : पत्रपरिषदेत माहिती

September 2, 2023

याेग आणि निसर्गाेपचार भारतीय संस्कृतीचे घटक, जीवनशैली. मात्र आज जागतिक स्तरावर याेग प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वपूर्ण घटक ठरला आहे. योग, निसर्गोपचार व भारतीय पारंपारीक खेळ बाबत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन होत असून याेग ही सकारात्मक जीवनशैली असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या तिन्ही घटकांचा भारतीय पद्धतीनुसार संधाेधन हाेत प्रचार प्रसार व्हावा याकरीता केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे इंडियन नाॅलेज सिस्टीम सेंटरला मान्यता दिली आहे. गुरूवार दि.१८ मे २०२३ राेजी या सेंटरचा उद्घाटन साेहळ्याचे आयाेजन करण्यात येत असल्याची माहिती मंडळाच्या सचिव व श्री हव्याप्र,आई के एस चे समन्वयक प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, आई के एस चे सह समन्वयक डॉ. मयुरेश शिंगरूप आदी मान्यवर उपस्थित होते. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे देशभरात इंडियन नाॅलेज सिस्टीम सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया राबविली होती. यामध्ये देशभरातील २०० पेक्षा अधिक अर्ज शिक्षण मंत्रालयाला प्राप्त झाले हाेते. या निवड प्रक्रीयेमध्ये केवळ १२ अर्जांच्या अंतीम निवड प्रक्रीयेत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची निवड करण्यात आली आहे. या सेंटर द्वारे भारतीय पारंपारीक खेळ, याेग व निसर्गाेपचार क्षेत्रात संशाेधन करण्यास संधी मिळणार असून सर्वसामान्यांमध्ये याचा संशाेधनात्मक प्रसार प्रसार करण्याचे बळ मिळेल अशी माहिती श्री हव्याप्र, आई के एस चे समन्वयक प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके यांनी पत्रपरिषदेत दिली.

श्री हव्याप्र मंडळाचा रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाशी ऐतिहासिक करार देशातील पहिला सर्वाेच्च बहूमान मंडळाला : पत्रपरिषदेत माहिती भारतीय पारंपारीक खेळांचा देशासह जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार व प्रशिक्षणात्मक संशाेधन करणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आज आतंरराष्ट्रीयस्तरावर युनेस्काे सदस्य म्हणून क्रीडा क्षेत्रात यशस्वी कार्य करीत आहे. आता या क्रीडा कार्याला सर्वाेच्च बहूमान मिळाला असून जगातील प्रतिष्ठीत, नामांकीत रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाचा शैक्षणिक क्रीडा करार श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाशी हाेत आहे. मंगळवार दि.१६ मे २०२३ राेजी मंडळाच्या स्व. सामेश्वर पुसतकर सभागृह येथे आयाेजीत कार्यक्रमातून या शैक्षणिक क्रीडा कराराला मुर्त स्वरूप प्राप्त हाेणार आहे. थेट इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाशी हाेत असलेला हा खासगी करार देशातील पहिला असून याद्वारे दाेन्ही देशातील क्रीडा, शिक्षण व प्रशिक्षणाला नवीन काैशल्य लाभणार आहे. प्रामुख्याने भारतीय खेळाडू व विद्यार्थ्यांकरीता ही संधी उज्वल भवितव्य साकार करणारे असल्याची माहिती मंडळाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. प्रणव चेंडके यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. जागतिकस्तरावर क्रीडा क्षेत्राचे स्वरूप वेगाने वाढत आहे. परिणामी राेजगार क्षेत्रामध्ये क्रीडा कौशल्याला मोठ्या प्रमाणावर राेजगाराची संधी प्राप्त होत आहे. या क्रीडा क्षेत्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून पारंपारीक खेळांचा प्रचार, प्रसार करणारे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आज आधुनिक खेळांना प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत यशस्वीरित्या पाेहचवित आहे. प्रत्येक खेळांना तज्ञ प्रशिक्षण व खात्रिशीर यश हे मंडळाच्या प्रशिक्षणाचे वैशिष्ट. या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्रशिक्षण व तज्ञ मार्गदर्शनाचा लाभ स्थानिक खेळाडूंना मिळावा याकरिता रशियन इंटरनॅशनल ऑलम्पिक विद्यापीठाशी हा करार देशस्तरावर लक्षवेधी ठरणारा असल्याची माहिती प्रा. प्रणव चेंडके यांनी दिली. यावेळी पत्रपरिषदेला मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे आदी मान्यवर हाेते. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठ यामध्ये हाेत असलेला शैक्षणिक क्रीडा करार देशस्तरावर प्रथमच हाेत आहे. या सर्वाेच्च उपलब्धी करीता प्रा. प्रणव चेंडके यांनी अथक परिश्रम फलश्रुत ठरलेत. प्रा. प्रणव चेंडके यांनी याच रशियन विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त केले असून मंडळाचे आतंराष्ट्रीय समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळतांना त्यांनी या रशियन इंटरनॅशनल ऑलेम्पीक विद्यापीठाशी संपर्क साधत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा प्रशिक्षण कार्याला एक नवी उंची मिळवून दिली आहे. आज जागतिकस्तरावर ऑलेम्पीक स्पर्धा विविध खेळासाठी प्रतिष्ठित मानल्या जाते. या ऑलेम्पीक स्पर्धांमधील यशस्वी खेळाडूंना जागतिक स्तरावरील किर्ती प्राप्त होत असते. जगातील बहूतांश यशस्वी खेळाडू हे ऑलम्पीक विद्यापीठातून प्रशिक्षीत झालेले असतात. जगामध्ये केवळ तीन ऑलेम्पीक विद्यापीठ असून रशियन इंटरनॅशनल ऑलम्पिक युनिर्व्हसिटी सर्वोच्च मानल्या जाते. या विद्यापीठाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळे अशा किर्तीमान रशियन विद्यापीठाशी श्री हव्याप्र मंडळाशी शैक्षणिक क्रीडा करार देशासह अमरावतीकरांकरीता अभिमानाची बाब ठरली आहे.