यशाेगाथा : केला निर्धार ! विदेशात सुरू केला स्वयंराेजगार.. श्री हव्याप्र याेग विभागाचा विद्यार्थी देताे विदेशियांना याेग बळ

  • June 8, 2023

शिकुन, शिकुन शिकायचं तरी किती ? अनेक डिग्री, डिप्लोमा, वाट्टेल ते प्रशिक्षण तरीही राेजगाराच्या रांगेत उभाच ! नोकरीच्या आशेने तरुणांची रांग लांबच लांब. काहींना जॉब, बाकींना वेटिंगची साथ. हे चित्र आजच्या सुशिक्षित तरूणांचं. एकीकडे शासकीय नाेकरीची टंचाई तर दुसरीकडे घरावर तुळशीपत्र ठेवून राेजगाराची वाट शोधायची. वाढते वय आणि बेराेजगारीमुळे आजचा तरूण तणावग्रस्त हाेत चालला. हा तणाव केवळ एकट्याचा नाही तर ताे संपुर्ण घराचा. हे सर्व चित्र एक विद्यार्थी पाहत हाेता, अवलाेकन करीत हाेता. शिक्षणातून जे काैशल्य शिकलाे त्यातून स्वत:चा व्यवसाय थाटायचा मग ताे कुठीही असाे. त्याने निर्धान केला आणि चक्क दुसऱ्या देशात जावून स्वत:चा रोजगार थाटला. ही यशाेगाथा आहे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील योग विभागाच्या विद्यार्थ्याची. कारंजा लाड येथील खेर्डा गावातील हेमंत भिवरकर याने श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील याेग विभागातून बी.ए व एम.ए याेगशास्त्र शिक्षण पुर्ण केलं. शिक्षण पुर्ण झालं, पदवी मिळाली, पदव्युत्तर शिक्षणही पुर्ण झालं आता प्रतिक्षा हाेती ती राेजगाराची. परंतु राेजगाराची एकुण दैनावस्था पाहता नेमकं आयुष्य कसं जगायचं हा यक्ष प्रश्न हेमंत समाेर हाेता. याेगची पदवी पण त्यावर शाश्वत राेजगार मिळणार ? हा संभ्रम हेमंतच्या मनात गोंधळ घालत होता. अशावेळी त्याने चिंतन करीत स्वत:चा मार्ग निवडला. त्याने योग विभाग प्रमुख डाॅ. सुनील लाबडे, प्रा. नितीन काळे व इतर प्राध्यापक व प्रशिक्षकांशी चर्चा करीत आपला स्वयंराेजगाचा मार्ग निवडला. परंतु व्यवसाय करायचा तरी कसा आणि कुठे ? कारण याेग भारतीय पद्धती असली तरी याबाबत बहुतांश नागरिक योग पासून दूरच. अशावेळी त्याला मदत मिळाली ती व्हिएतनाम येथील याेगगुरू देवदत्त भारदे यांची. त्यांनी हेमंतला व्हिएतनाम येथे स्वयंरोजगाराची दिशा दाखवली. हेमंत ने ठरवले, आणि पैशांची जुळवाजुळव करीत २०२१ मध्ये व्हिएतनाम गाठले.

याेग गुरू भारदे यांच्या सहकार्याने त्याने एका ठिकाणी योग शिक्षक म्हणून व्हिएतनाम देशात नोकरी केली. एक वर्ष पूर्ण होत नाही हेमंत ने विदेशात स्वतःचे ‘ओम योग स्वास्थ रक्षा’ नावाने योग प्रशिक्षण केंद्राची सुरूवात केली. सुरवातीला एक दाेन लाेकांनी त्या सेंटरमध्ये प्रवेश घेतला. हेमंतने आत्मसात याेग कौशल्य द्वारे त्यांना योग प्रशिक्षण दिले. हेमंतचे प्रशिक्षण काैशल्य पाहून त्याची प्रसिद्धी हाेत गेली. पाहता, पाहता त्यांच्या केंद्रावर याेग शिकणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आज हेमंतच्या सेंटरवर प्रवेश घेणाऱ्यांना वेटिंगवर राहावे लागत आहे. काैशल्य आणि धाडसी निर्णयामुळे हेमंत नाेकरीपेक्षा स्वयंराेजगाराने सक्षम झाला आहे. आज हेमंत चे वियतनाम या देशात दोन योग प्रशिक्षण केंद्र आहेत. ही भारतीयांसाठी व योग क्षेत्रातील साधकांसाठी अभिमानाची बाब आहे. ही यशोगाथा युवापीढीला निश्चित प्रेरणा देईल असा विश्वास मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. श्रीकांत चेंडके, सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, प्राचार्य डाॅ. श्रीनिवास देशपांडे, डाॅ. अरुण खोडस्कर, डाॅ. सूर्यकांत पाटील, डाॅ. सुनील लाबडे, प्रा. नितीन काळे, प्रा. प्रविण अनासाने यांचेसह मंडळातील सर्व प्राध्यापक, प्रशिक्षक वर्गाद्वारे व्यक्त होत आहे. एखादा विचार एखाद्याकरीता यशाची पर्वणी ठरू शकते. मी याेगाचे शिक्षण घेत असतांना मंडळामध्ये सातत्याने कार्यक्रमांचे आयोजन हाेत असते. अशा अनेक कार्यक्रमांमध्ये मी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांना ‘आगे बढाे, सबसे आगे बढाे’ चा नारा देताना ऐकत होते. जेव्हा शिक्षण पुर्ण झालं तेव्हा राेजगाराचा प्रश्न एक माेठं आव्हान माझ्या समाेर हाेतं. व्यवसायाचे ज्ञान नव्हते नाेकरीची शाेधाशाेध करायची नव्हती. अशावेळी व्हिएतनाम देशाची संधी चालुन आली तेव्हा आत्मविश्वास डगमगत हाेता, काय करावे, जायचे की नाही अशा विचारांचा गाेंधळ मनात सुरू असतांना ‘पद्मश्रींचा’ ताे नारा आठवला. ‘आगे बढाे सबसे आगे बढाे… करते रहाे देखा जायेगा’ ! बस ठरवलं आणि व्हिएतनाम गाठलं. मंडळाच्या याेग विभागाचे मार्गदर्शन आणि याेग गुरू भारदे सरांचे सहकार्यामुळे आज मी माझ्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी ठरलाे असल्याचे समाधान हेमंत भिवरकर ने व्यक्त केले.

आजच्या युवा पीढीमध्ये प्रचंड क्षमता आहे. गरज आहे त्यांना याेग्य दिशा देण्याची. ‘सक्षम युवा पीढी, सक्षम समाज, देश’ हेच ध्येय श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे असून त्यावर अविरत कार्य सुरू आहे. हेमंत ची यशाेगाथा खराेखर प्रेरणादायी असून मंडळाच्या शिक्षण-प्रशिक्षणातून ताे यशस्वी पथावर आहे याचं खरं समाधान आहे. पूर्वीच्या तुलनेत आजच्या तरूणांसमाेर विविध व माेठ्या संधी उपलब्ध आहेत. आपली क्षमता, काैशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर युवा पीढीने स्वत:चं अस्तीत्व निर्माण करणे गरजेचे आहे.

EVENT INFO :

  • Start Date:June 8, 2023
  • End Date:June 8, 2023
X